महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात बारावी विज्ञान मार्गदर्शन कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात दि. २९ व ३० डिसेंबर २०२३ या दोन दिवशी बारावी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी बारावी बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवावी? याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक अशोक अप्पा उपासे उपस्थित हे होते. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांना उपस्थितांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे प्रास्ताविक करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीमध्ये जास्तीचा ताण-तणाव घेऊ नये. वेळेचा सदुपयोग करावा. सातत्यपूर्ण अभ्यास करावा व जास्तीत जास्त बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.
या कार्यशाळेत बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये आई-वडिलांबरोबर शिक्षकांचा फार मोठा सहभाग असतो. सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे व नियोजनाप्रमाणे अभ्यास करून गुणवत्तेचा आलेख चढत्या क्रमाने ठेवावा.
अध्यक्षीय समारोप करताना अशोक आप्पा उपासे म्हणाले की, विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास होण्यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी गुणात्मक विकास करून स्वतःचा, आई-वडिलांचा, महाविद्यालयाचा व संस्थेचा नाव लौकिक करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यशाळेत प्रा. सूर्यवंशी के. आर.(गणित), डॉ. गुणवंत बिरादार (पशुविज्ञान व तंत्रज्ञान), प्रा. आनंद खरपडे (डेरी सायन्स), प्रा. पटने वाय. बी. (क्रॉप सायन्स). डॉ. टी. घन:श्याम (हिंदी), प्रा. सोनोने रवींद्र (पाली), प्रा. दुडीले व्यंकट (मराठी), प्रा. पाटील व्ही. सी. (भौतिकशास्त्र), प्रा. पांढरे जी. एल. (रसायनशास्त्र), प्रा. पानगावे संगमेश्वर (वनस्पतीशास्त्र)., प्रा. माळी श्रीकांत (प्राणीशास्त्र), प्रा. सुप्रिया बिराजदार (इलेक्ट्रॉनिक्स), प्रा. लखादिवे संपदा (इंग्रजी) यांनी विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यशाळेत बारावी विज्ञान वर्गातील एकूण साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. संजय पवार यांनी केले व आभार कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांनी मानले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी सुरेश येरुळे, जगन्नाथ येंचवाड, संतोष येंचवाड, रघु शिंदे केशव घंटे, अशोक शिंदे, गोपाळ तिरमले, शुभम बिरादार, राजाभाऊ बोडके, लोंढे मावशी, सय्यद जलील यांनी परिश्रम घेतले.