आपला जिल्हा

मालमत्‍ताकरामध्‍ये १०% सवलतीस १५ जुलै पर्यंत मुतदवाढ- आयुक्त बाबासाहेब मनोहरे

लातूर : लातूर शहर महानगरपालिका,हद्दीतील मालमत्‍ताधारकांस सन २०२४-२५ ची मालमत्ता कराची देयक वाटप केली असून कर वसुलीस सुरुवात झाली आहे. सदरील आर्थिक वर्षात नियमितपणे व सुरुवातीस कर भरणारे मालमत्ताधारकासाठी विविध सुट/सवलती देण्यात आले आहेत. मनपा प्रशासकीय ठराव क्रं.१९६ अन्‍वये ३० जून पर्यंत मालमत्ता कर online भरणा-यास १० % सवलत देण्यात आली होती. माहे जून अखेर जवळपास ५.५ कोटी टॅक्स वसुली मनपाच्या कर संकलन विभागामार्फत झाली आहे. सदर योजनेस मालमत्‍ताधारकांचा मिळणारा उस्फुर्त प्रतिसाद , कर भरणा केंद्रावर होणारी गर्दी व मागणी पहाता १० % सवलतीस १५ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी घेतला आहे. 

       कर भरणा करण्‍यासाठी mclatur.org, LaturProperty Tax सिटीझन अ‍ॅप किंवा propertytax.mclatur.in या वेबसाईटचा वापर करावा व आपल्‍याकडील देय कराचा भरणा करून वरील देण्‍यात आलेल्‍या सवलतीचा लाभ घ्यावा.

         शहरातील मालमत्‍ताधारकांनी देण्‍यात आलेल्या   मुदतवाढीचा व  सवलतीचा लाभ घेवुन आपल्‍याकडील देय असलेल्‍या मालमत्‍ताकराचा व पाणी पट्टीकराचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे व मनपाचे नियमित करदाते व्‍हावे असे आहवानही आयुक्तांनी केले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button