राजकारण

समाजकारण आणि राजकारण

राजकारण आणि समाजकारण” हे दोन भिन्न विषय असले तरी एकमेकांना पूरक आहेत.या बाबीचा अभ्यास करणं आजच्या तरुण पिढीला गरजेचे आहे.या विषयास आपण विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिला हवे ‘राजकारणात’ अनेक गट, पक्ष निर्माण होतात.याउलट समाजकारणात ‘संघटन’ होते.या संघटनातून अनेक सामाजिक संस्था उभ्या राहतात.संस्थेद्वारे लोकमत तयार करणारी कार्य घडतात. मुळात सत्तेचा स्त्रोत लोक असतो.लोक आपल्या आवडीचे प्रतिनिधी निवडून सरकार स्थापन करतात.सत्ता आणि अधिकार लोकांच्या मतावर अवलंबून असते.हे मात्र तेवढेच खरे म्हणूनच भारतात लोकशाही प्रणालीला महत्त्व आहे.
प्रामुख्याने युवा वर्गाचा कल समाजकारण आणि राजकारणात वाढायला हवा हे खूप महत्त्वाचे ठरते.राजकारण समजून घेताना समाजकारण समजून घेणे गरजेचे आहे.हे समजून घेताना दोन्ही विषयाची गुंफण एकाच धाग्यात करून हा विषय समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
राजकारणात काही सामाजिक घटकाचा लिलाव होताना दिसतो.यामुळेच मतभिन्नता निर्माण होते. मतभिन्नतेमुळे समाजात गटबाजी निर्माण होते.याच मतभिन्नतेतून “राजकीय पक्ष” निर्माण होतात.हे राजकीय पक्ष समाजातील गट असतात.त्यांचा थेट राज्यातील सत्तेशी संबंध येतो.आणि राजकीय पक्षाचा मूळ उद्देश सरकारी सत्ता मिळवणे हाच असतो. “समाजकारण आणि राजकारण” भिन्न वाटत असले तरी एकमेकांशी जोडले पाहिजे जोडता आलं पाहिजे कारण; समाजकारणातून समाज हित जोपासलं जातं. लोकांच्या गरजा जाणून घेतल्या जातात.त्या पूर्ण कशा करता येतील याचा अभ्यास जाणवपूर्वकक केला जातो.यात प्राथमिक दुय्यम गरजा अभ्यासल्या जातात.याच समाजकारणातून लोकमत तयार होते.कोणी कसा किती समाजकार्यास हातभार लावला जनतेच्या हिताची कामे कोणी केली. पक्षाचे सामाजिक कार्य,सामाजिकदृष्ट्या प्रतिनिधित्व करणारे नाव, चेहरा समोर ठेवून समाजातील लोक आपली मते तयार करतात.याच लोकमतातून कोणता पक्ष निवडणुकीत बाजी मारणार हे ठरले जाते.जो पक्ष लोक मताच्या जोरावर बाजी मारतो तो “सत्ताधारी पक्ष” म्हणून गणला जातो.सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या हातात सत्ता असते.या सत्तेचा वापर समाजकारणात करणे अवघड नसते.थोडक्यात काय राजकारणाबरोबरच समाजकारण घडवता येते.समाजकार्यातून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला जातो.मने जिंकून लोकांचा प्रवाह आपल्या पक्षाच्या बाजूने वळविणे ही .खऱ्या राजकारण्याची खासियत असते.
“राजकारण आणि समाजकारण” विषय भिन्न परंतु दोन्हीची सांगड किती महत्त्वाची हे आपण पाहिले नेमकं “राजकारण” म्हणजे काय? आणि “समाजकारण” म्हणजे काय? थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राजकारण :
आपण सहजच बोलून जातो हल्ली राजकारण कुठे नाही?प्रत्येकच ठिकाणी राजकारण तर चालते.आयुष्य जगताना स्पर्धेला सामोरे जावे लागते.अगदी स्कूल कॉलेज पासून या स्पर्धेचा अनुभव आपण घेतो.एखादा व्यक्ती आत्मिक प्रतिक्रिया देताना मला राजकारण करायला आवडत नाही! मी कोणाशी स्पर्धा करत नाही! असे बोलताना तो प्रत्यक्षात स्वतःशी स्पर्धा करतो.स्पर्धा आपला पिच्छा सोडत नाही. सांगण्याचे कारण; “सत्तेसाठी स्पर्धा म्हणजेच राजकारण होय”आजचे राजकारण खुर्चीसाठी टीका-टिप्पणीचे, फोडाफोडीचे आहे.राजकारण म्हटलं की या गोष्टी आल्याचं हे सर्व जो सहन करतो तोच राजकारणात खरा टिकतो.राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे.सर्वसामान्यांच वाक्य असतं राजकारणात पडू नये.सर्व सामान्य स्तरातील लोक (जनता) राजकीय क्षेत्राकडे वळत नाहीत
“राजकारण” ही खूप व्यापक संकल्पना आहे. ‘देश चालविण्याची प्रक्रिया म्हणजेच राजकारण होय’. आणि देशाला याची गरज आहे. याशिवाय देश कसा चालणार,परकीय आक्रमण कसं रोखलं जाणार देशरक्षण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी राजकारणाचा अभ्यास डोळसपणे करणे गरजेचं
ठरत राजकारण हे निवडणूकिपूरत मर्यादित नाही.अनेक नेते निर्णय प्रक्रियेत सहभाग घेऊन देश चालविण्यासाठी प्रामुख्याने कार्य करतात त्यास राजकारण म्हणतात.
समाजकारण :
“समाज म्हणजे व्यक्तींच्या समूहाची मिळून बनलेली संघटना होय” समाजकारणात समाजाची होणारी पिळवणूक थांबवून त्यांच्या प्रगतीचे कार्य केले जाते.
समाजकारणात समाज पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यात येते. समाजामधील लोकांची उन्नती साधण्याचा प्रयत्न प्रामुख्याने होतो.यातूनच समाजाची उन्नती म्हणजेच देशाची उन्नती साधली जाते.यामुळेच समाजकारण हा अत्यंत महत्वपूर्ण जिव्हाळ्याचा विषय आहे.
समाजकारणात अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या जातात.जेणेकरून या योजनांचा फायदा समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी होत असतो. समाजकारणामुळे प्रगतशील समाजाची निर्मिती होते.
“राजकारण आणि समाजकारण” या लेखातून एवढेच सांगायचे आहे की, दोन्ही विषयाच्या कार्याची सांगड घालून देशाला प्रगतीपथावर नेता येते.यात आजच्या तरुण पिढीचा सहभाग खूप महत्त्वाचा असून सकारात्मक दृष्टीने दोन्ही विषयाकडे पाहण्याची गरज आहे. या विषयावर अधिक- अधिक लिखाण होने देखील तेवढेच गरजेचे “राजकारण आणि समाजकारण” तसा विषय खूप व्यापक आहे. परंतु या लेखाच्या माध्यमातून या विषयास न्याय देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

राणी भालेराव., पुणे, महाराष्ट्र
9527820435

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button