माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी
लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते
नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व आमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. याप्रसंगी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा चेअरमन विजय देशमुख,
विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रवींद्र काळे, संचालक गोविंद डूरे पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजकुमार पाटील, लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातंबरे, लातूर जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, हनमंत पवार, सुमुख गोविंदपुरकर, सचिन मस्के आदिसह काँग्रेस पक्षाचे विविधपदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.