केरळ स्टोरी चित्रपटा साठी अर्थवर्धिनीचा पुढाकार
लातूर : वर्षे १४ ते १८ वयात मुलिंमध्ये नैसर्गिक शारेरीक आकर्षण निर्माण होते. या शारेरीक आकर्षणाचा गैरफायदा घेत मुलींना प्रेमाच्या जाळ्यात आडकवायचे व तिला इसिसच्या ताब्यात द्यायचे. तिच्यावर अमानुष अत्याच्यार करायचा. तिचे पूर्ण आयुष्य उध्वस्त करायचे हा कुटील डाव देशविरोधी संघटने कडून खेळला जात आहे. याचे चित्रण द केरळ स्टोरी या चित्रपटात करण्यात आले आहे.
हा नियोजीत कुटील डावा मुलिंना व महिलांना माहित व्हावा व त्यांनी यापासून वेळीच सावध व्हावे यासाठी अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्था व श्री गुरूजी पतसंस्थेच्या वतीने
पतसंस्था अध्यक्षा अभि. गीता ठोंबरे यांच्या पुढाकाराने महिला संचालिका, महिला कर्मचारी व त्यांच्या मुलींसाठी द केरळ स्टोरी या चित्रपटाचे आयोजन पीव्हीआर थेअटर येथे करण्यात आले होते. संचालिका अनुपमा पाटील स्मिता अयाचित, सगुणा शिवनगीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यवस्थापिका अमृता देशपांडे, अश्विनी मोरे, कर्मचारी संपदा भालेकर, रेणूका कुलकर्णी, श्रूती पळणीटकर, धनश्री कुलकर्णी, भाग्यश्री औटी, ऋतुजा अघोर यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या उपक्रात उच्चशिक्षित महिला व मुलिं सहभागी झाल्या होत्या.