मनोरंजन

प्रेम कधी झाले? हे कळलेच नाही


तीची पहिली भेट ही एका महाविद्यालयाच्या गेट जवळ झाली होती.ती आपल्या लहान भावाच्या प्रवेशा साठी आली होती.पण तीच्या व लहान भावाच्या डोळ्यात पाणी आले होते.तेवढ्यात तेथे ओम नावाचा एक मुलगा येतो आणि त्यांना विचारतो की ,“काय झाले आहे. ”?तेव्हा प्राची सांगते की, “माझ्या लहान भावाला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही ”.त्यावर ओम विचार तो ,“का बरं प्रवेश मिळाला नाही ”? त्याला ती सांगते की ,“आम्हाला यायला उशीर झाला. म्हणून प्रवेश मिळाला नाही.”त्यावर ओम पुन्हा विचारतो की ,का उशीर केला?त्यावर राजीव सांगतो की ,“सर आमच्या कडे फिस साठी पैसे नव्हते म्हणून उशीर झाला .माझे बाबा हे मजूरी करतात. ”हे ऐकल्यावर ओम म्हणतो ,ठीक आहे.“हे पाहा रडू नका आपण प्राचार्यांना भेटून बोलूया काय म्हणतात ते पाहू ”या त्यावर प्राची म्हणते ,“तुम्ही कोण आहात?
आणी ऐवढी विचारपूस का करताय? ”यावर ओम हासत म्हणतो की ,“मी एक समाज सेवक आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी काम करतो.चला प्राचार्यांना प्रवेशासाठी बोलून बघुया काय म्हणतात ”.तेव्हा ते तिघे जण कॉलेजच्या प्राचार्यांकडे जातात आणि ओम सरांना बोलतो आणि सर्व परस्थिती सांगतो .तेव्हा प्राचार्य राजीवचे १०वीची मार्कसीट बघतात .त्यात त्याला 95 टक्केगुण मिळालेले असतात. हे पाहूण प्राचार्य सर त्याला म्हणतात ,“हे बघ बाळा तुला तर १० वीत चांगले गुण मिळाले आहेत. घाबरू नको .तुला तर आम्ही प्रवेश देवू ”अणि त्याला प्रवेश मिळतो .त्यावर ओम प्राचार्यांचे आभार मानतो. ते तिघे तिथून बाहेर पडतात.
बाहेर आल्यावर प्राची ओमला म्हणते ,“धन्यवाद सर ”तुमच्या मुळे माझ्या भावाला प्रवेश मिळाला .त्यावर ओम म्हणतो ,“धन्यवाद काय म्हणताय हे तर माझे कामच आहे.” असे म्हणून ओम तेथून जात असतो तेव्हा अचानक प्राची हाक मारते ओम सर . ….हाक ऐकून

ओम एका क्षणात थांबतो म्हणतो ,“काय झाले ”?प्राची त्यावर म्हणते, सर याला तुमचा मोबाईल नंबर द्या. जेणेकरून कधी अडचण आली तर राजीव ला फोन करता येईल तुम्हाला.
.तर तो तुम्हाला फोन करेन त्यावर ओम आपला मोबाईल नंबर देतो.आणि तेथून निघून जातो .
काही दिवसांनी ओम काही कामासाठी पुन्हा महाविद्यालयात जातो .तेव्हा तेथे त्याला राजीव भेटतो ओम त्याला विचारतो काय राजीव काय चाललय?कसा आहेस?अभ्यास चालू आहे का? त्यावर राजीव म्हणतो सर अभ्यास तर खुप चांगला चालू आहे.सर आज मि तुम्हाला फोन करणारच होतो. ओम विचारतो ,“काय रे !का बर ?फोन करनार होतास.?”त्यावर राजीव म्हणतो ,“काही नाही सर आज आमच्या घरी पुजा आहे. आणी प्राची ताई आणि बाबांनीतुम्हाला प्रसादासाठी घरी बोलावले आहे.” त्यावर ओम म्हणतो ठीक आहे.तुझे घर कोठे आहे.?त्यावर राजीव आपल्या घराचा पत्ता देतो आणि आपल्या वडिलांचा मोबाईल नंबर देतो.“आज दुपारी नक्की या बर का सर ?”असे राजीव म्हणतो.त्यावर ओम म्हणतो की ,“हो आज दुपारी नक्की येतो. ”प्रसादासाठी ऐवढे बोलून ओम तेथून आपले काम करण्यासाठी महाविद्यालयात जातो आणी पुन्हा प्राचार्यांना भेटून आपले काम करून निघून जातो.
आणी राजीवला वचन दिल्याप्रामाणे ओम दुपारी राजीवच्या वडीलानां फोन करून घरी प्रसाद घेण्यासाठी राजीवच्या घरी जातो.आणि प्रसाद घेतो पण त्याची नजर ही सारखी प्राचीला शोधत असते कारण त्याला तेथे प्राची कुठेच दिसत नसते.त्यावर ओम राजीवला विचारतो की ,“आरे तुझी दिदी कुठेच दिसत नाही.कुठे आहे”.त्यावर राजीव म्हणतो ,“सर ती आत आहे.जेवण तयार करत आहे,ती खुप चांगले जेवण तयार करते.पण ती भजे

आणि पुरण पोळी तर खूपच चांगली बनवते.”असे राजीव सांगतो.त्यावर ओम असे म्हणून गोड हासतो.ओमला प्राचीला भेटण्यासाठी सारखा जीव कासावीस होत असतो.ओमला त्या दिवसी प्राची भेटत नाही.आणि ओमचा मुड खराब होते.तो प्रसाद घेवून तीथून निघून जातो.
प्राची काही दिवसांनी ओमला बाजारात भेटते आणि ओम प्राचीला कॉफीसाठी विचारतो त्यावर प्राची म्हणते,“ आज नको सर, मला घरी जाण्यासाठी खुप उशीर होईल कारण आजून मला बरेच काही घरातील सामान खरेदी करायचे आहेत”.त्यावर ओम पुन्हा म्हणतो,“ प्राची १०मीनीट लागतील आपल्याला कॉफी घेण्यासाठी वाटले तर सामान खरेदीसाठी मी मदत करेन त्यावर प्राची हासते आणि म्हणते ठीक आहे.सर फक्त १० मिनटे बर का “सर त्यावर ओम म्हणतो ,हो ,प्राची मॅडम ज्यास्त वेळ नाही घेणार.”आणि तो ही हासतो. दोघे जण कॉफी घेण्यासाठी हॉटेल मध्ये जातात आणि दोघे कॉफी घेत बोलत असता.तेव्हा प्राची विचारते “,सर समाजसेवा सोडून काय काम कराता” ?त्यावर ओम म्हणतो ,मी एका वृत्तपत्रात “वसूली प्रतीनिधी ”म्हणून काम करतो.आणि ओम प्राचीला विचरातो की,“ तुझे शिक्षण काय झाले आहे”?.त्यावर प्राची म्हणते ,“सर माझे शिक्षण फक्त १० वी झाले आहे.आणि मला पण पुढे शिक्षण घ्यायचे आहे.आमची परिस्थीती चांगली नसल्यामुळे मला माझे शिक्षण बंद करावे लागले.आता मी एका दुकानात काम करते.” त्यावर ओम म्हणतो, कोणत्या दुकानात आणि पगार किती मिळतो तुला?.प्राची सांगते की ,“मी एका कापड दुकानात काम करते आणि पगार मला पाच हजार ऐवढाच आहे.”त्यावर ओम म्हणतो ,तुला एका कॉलजे चे नाव देतो तेथे तु फक्त रविवारीच कॉलेज करू शकते.आणि बाकी तु काम सुध्दा करू शकतेस.त्यावर प्राची आंनदी होते.आणि विचारते? खरेच का !सर माझी थट्टा तर करत नाहीत ना?त्यावर ओम हासतो आणी म्हणतो नाही मी तुझी थट्टा करत नाही.आणि प्राचीला त्या कॉलेजचे नाव सांगतो. तेथे तुला फीस पण जास्त नसेल तुझे शिक्षण पण पुर्ण होईल.आणि प्राची दुसर्‍या दिवशी ओमला फोन करते आणि म्हणते सर मला तुम्हाला भेटायचे आहे. त्यावर ओम म्हणतो ठिक आहे. भेटूया प्राची ला ओम विचारतो की ,“प्राची कुठे भेटायचे ठिकाण सांग ?मि यतो तेथे ”त्यावर प्राची म्हणते ,सर काल जेथे भेटलो तेथेच भेटूया .”ओम म्हणतो ,ठीक आहे. आणि प्राची त्याला दुसर्‍या दिवशी त्याच ठिकाणी भेटते तेथे पुन्हा दोघे जण कॉफी घेतात.
प्राची म्हणते ,सर मला त्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्यावर ओम म्हणतो ठिक आहे. आपण आज जावून चौकशी करूया की ,प्रवेश कधी चालू होतील आणी फीस किती आहे.? ते दोघे जण त्या कॉलेज मध्ये जातात आणि संपुर्ण माहिती घेतात. असे त्यांच्या भेटी वाढत जातात आणि ओम ला तर प्राची जेव्हा भेटली असते तेव्हापासून ती खूप आवडत असते आणि एके दिवसी ओम प्राचीला विचारतो की,“ प्राची तु मला खूप आवडतेआणि माझ्यासी लग्न करशील का “?त्यावर प्राची लाजून तेथून निघून जाते.आणि ओम ला त्याच्या प्रश्‍नाचे उत्तर काहीच मिळाले नाही. तो त्या दिवसी दिवसभर उदास होतो.कारण त्याला काहीच कळले नाही.ती चा होकार आहे की नकार. त्यावर ओम पुन्हा तिला फोन लावतो आणि विचार तो की, प्राची माझ्या प्रश्‍नाचे उत्तर आज मला मिळाले नाही.त्यावर प्राची हासते आणि उद्या भेटल्यावर सांगते असे म्हणून फोन ठेवते.आणि ओम आजून जास्त उदास होतो.आणि या सर्व गोष्टी आपल्या मित्राला सांगतो आणि आता काय म्हणेल ती माझ्या बरोबरची ती मैत्री तर तोडनार नाही ना?असे एक ना अनेक प्रश्‍न त्याला पडतात .अगदी जवळच्या मित्राला विचारतो. त्यावर त्याचा मित्र अमित म्हणतो हे बघ जास्त त्रास करून घेवू नको रे काय म्हणली ती भेटून सांगते म्हणलीना ,ती हासत होती. त्यावर अमित ओमची समजूत काढत सांगत होता.तरी त्या दिवशी ओमचे कशातच लक्ष लागत नव्हते .अमित आमचे हे सर्व परिस्थती पाहून तो सूध्दा चिंतेत पडतो की आता याला कसे समजून सांगावे की म्हणजे हा आपले काम करेल त्यावर अमित त्याला एका पिक्चरला घेवून जातो. आणि तरी त्याचे मुड बदलत नाही हे पाहून अमित त्याला त्याच्या आवडीच्या हॉटल मध्ये घेवून जातो आणि तेथे त्याला आवडत असलेल्या सर्व गोष्टी मागतो हे पाहून सुध्दा ओम च्या चहर्‍या वरील हासू काही केल्या वापस येत नव्हते.अशाप्रकारे दिवस भर ओम उदास आणि विचारात तच होता.आणि दुसर्‍या दिवशी प्राचीला तो पुन्हा फोन करतो आणि विचारतो की ,माझ्या प्रश्‍नाचे उत्तर कधी मिळेल .त्यावर प्राची पुन्हा हासते आणि म्हणते आज आपण भेटूया त्याच हॉटेलवर कॉफी घेत सांगते नाही ऐवढी काय गडबड आहे. आणि शेवट प्राची ओमला भेटते आणि आपला होकार सांगते.
आणि ओमचा जिव सुटकेचा श्वास घेतो.आणि दोघे जण नेहमीच ओमच्या ऑफीस च्या पाठी मागील एका पार्क मध्ये नेहमी भेटायचे आणि ऐकदा त्या पार्क मध्ये प्राचीचा लहान भाऊ आपल्या मित्रासोबत आलेला होता.आणि प्राचीला आणि ओमला सोबत बघुन तो त्यांच्या जवळ गेला आणि म्हणला प्राची ताई तु इथे ओम सरा सोबत काय करतेस त्यावर ओमने राजीव ला सर्व गोष्टी सांगतले की आमचे दोघाचे एकमेकावर खूप प्रेम आहे . हे सर्व गोष्टी ऐकल्यावर राजीव म्हणतो सर हे सर्व गोष्टी ठीक आहेत.पण आमचे वडील हे कदापि मान्य करनार नाहीत.कारण की, आमचे वडील हे खूप जुन्या विचाराचे आहेत. आणि त्यांना हे मान्य होणार नाही. मला माहित आहे सर तुम्ही खूप चांगले आहेत.पण आपली जात एक नाही. त्यामुळे खूप अडचणी निर्माण होतील असे राजीव म्हणतो.आणि माझा तुमच्या दोघांना पाठिंबा असेल पण तुमच्या घरचे आणि माझ्या घरच्यांना हे कधीच मान्य होणार नाही.
असे म्हणून राजीव तिथून निघून गेला आणि प्राची व ओम हे दोघे विचारात पडले .आता काय करावे राजीव म्हणतो तो खर बोलत आहे .दोघेही खूप विचार करतात आणि ओम म्हणतो घाबरू नकोस त्याच्यावर आपण नक्कीच काहीतरी पर्याय निघेल असे म्हणून ते तिथून निघून जातात

उर्वरित भाग पुढील भागात

लेखक ओंकार गोटेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button