अनाधिकृत होर्डिंग वर शनिवारीही मनपाची कार्यवाही
दिवसभरात २ गुन्हे दाखल,३ होर्डिंग, ८ बॅनर निष्काशित केले
लातूर : घाटकोपर मुंबई येथे सोसाटयाचा वारा व वादळामुळे होर्डिंग कोसळुन अपघात होऊन जिवित हानी झालेली आहे. सदयस्थितीत कधीही वारा व वादळी वाऱ्यामुळे, पावसामुळे, विजेमुळे होर्डिग्ज,फलक पडून अपघातांची घटना घडू शकते. त्यादृष्टीने लातूर शहरातील अनाधिकृत होर्डींग्जवर मनपाव्दारे कार्यवाही करण्यात येत आहे.
त्यामुळे दि. १८/०५/२०२४ रोजी ३ होर्डींग्ज ज्याची साइज ३० बाय २५ व १० बाय २० निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. व लहान बॅनर ८ निष्कासित करण्यात आलेल्या आहेत. तसेच क्षेञिय कार्यालयामार्फत २ (दोन) गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशानुसार व उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख व मालमत्ता व्यवस्थापक रवि कांबळे आणि त्यांच्या पथकांनी सदर कार्यवाही केली.त्याअनुषंगाने लातूर शहरातील ज्या खाजगी मालमत्तांवर होर्डींग्ज लावण्यात आलेले आहेत, सदर होर्डींग्ज हे रविवार पर्यंत संपूर्ण स्ट्रक्चरसहीत काढून घेण्यात यावे. सदर होर्डींग्ज सोमवारी निदर्शनास आल्यास सदर मालमत्ता धारकांवर व एजन्सी धारकांवर क्षेञिय अधिकारी यांच्यामार्फत गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. तरी ज्या खाजगी ईमारतीवर अनधिकृत होर्डींग्ज आहेत, त्या तात्काळ काढून घेवून मनपास सहकार्य करावे. सदरील होर्डींग्ज मुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊन जिवीत अथवा वित्तहानी झाल्यास त्यास संबंधीत अभिकरण (एजन्सी) / मालमत्ता धारक यांना सर्वस्वी जबाबदार धरणेत येईल व संबंधीत अभिकरण (एजन्सी) / मालमत्ता धारक यांचेवर सदोष मनुष्यकवधाचा गुन्हा दाखल करुन संबंधीत अभिकरण (एजन्सी/ मालमत्ताधारक) कार्यवाहीस पाञ राहतील. याप्रमाणे सुचना निर्गमित करण्यांत येत आहेत. सदर कार्यवाही रविवारी अशीच चालू राहणार आहे.