हुकूमशाहीच्या निषेधार्थ काँग्रेसचा सत्यागृह
लातूर : केंद्र सरकारच्या हुकुमशाहीवृत्तीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने देशभर आंदोलन केले जात आहे़ त्याचाच एक भाग म्हणून लातूर जिल्हा युवक काँग्रेस व लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने दि़ २६ मार्च रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात सत्यागृह करण्यात आले़, या सत्यागृहात राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील काँगेसजन व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली न्यायालयाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारच्या वतीने लोकसभा सचिवालयाकडून खासदार राहूल गांधी यांची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले़ केंद्र सरकार संविधानविरोधी काम करीत असून लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करीत लातूर जिल्हा युवक काँग्रेस व लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी येथील महात्मा गांधी चौकात केंद्र सरकारच्या विरोधात सत्यागृह करण्यात आला़.
या आंदोलनात लातूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड़ किरण जाधव, लातूर जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष विजय निटूरे, लातूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रान सय्यद, अभय साळुंके, अॅड़ समद पटले, अॅड़ दीपक सुळ, अॅड़ प्रमोद जाधव, संतोष देशमुख, विजयकुमार साबदे, गोरोबा लोखंडे, चंद्रकांत धायगुडे, रविशंकर जाधव, संभाजी सुळ, दगडुअप्पा मिटकरी, कैलास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अॅड़ देविदास बोरुळे पाटील, अॅड़ फारूक शेख, इसरार सगरे, प्रा. प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, अहेमदखान पठाण, व्यंकटेश पुरी, अॅड़ दीपक राठोड, आसिफ बागवान, सिकंदर पटेल, कलीम शेख, नामदेव इगे, हमीद बागवान, भाऊसाहेब भडिकर, संजय निलेगावकर, रत्नदीप अजनीकर, मुकेश राजमाने, रईस टाके, स्वाती जाधव, सुलेखाताई कारेपुरकर, शिलाताई वाघमारे, संजय सूर्यवंशी, रघुनाथ शिंदे, दिनेश नवगिरे, अकबर माडजे,अभिजित इगे,बालाजी झिपरे, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, अमित जाधव, अराफत पटेल, पवन सोलंकर, युनूस शेख, अजय वागदरे, सचिन कोतवाडे, बिभीषण सांगवीकर, सद्दाम बागवान, राजू गवळी, धनराज गायकवाड, अशोक सूर्यवंशी, प्रा. एम. पी.देशमुख, करीम तांबोळी, जमालोद्दीन मणियार, अमोल गायकवाड,अजीज बागवान, श्रीकांत गर्जे, मनोज देशमुख, ख्वॉजा पठाण, अॅड़ दिनेश रायकोडे, नागेश पटवारी, प्रकाश गायकवाड, सोनू पिंपरें, रवी पाटील, यशवंत पाटील, शिवाजी पकोळे, जय ढगे, महेश कोळे, केशरताई महापुरे, वर्षाताई मस्के, जफर पटवेकर, वैभव त्रिभुवन, यशपाल कांबळे, राहुल डुमने, शरद देशमुख, बाळासाहेब करमुडे,पिराजी साठे, अॅड़ अंगदराव गायकवाड,अब्दुल्ला शेख, आकाश मगर, सायरा पठाण, मेहर शेख, फरजाना शेख, उषा चिकटे, तनुजाताई कांबळे, अनिता रसाळ, कमलताई शहापुरे, विजय टाकेकर, युसूफ बाटलीवाला, इसरार पठाण, अॅड़ सुनीत खंडागळे, पवनकुमार गायकवाड, अविनाश बट्टेवार, अक्षय मुरळे, राजेश गुंठे, जगदीश तोटाळे, आसिफ तांबोळी, डॉ. आनंद पवार, युनूस मोमीन, रोहित वडरुळे, बप्पा मार्डीकर, अस्लम शेख, दयानंद कांबळे, धनंजय शेळके, संदीप ददापुरे, सचिन वाघमारे, अरशद बागवान, सुमन चव्हाण, शिवाजी देशमुख, संकेत उटगे, विकास वाघमारे, कागले विश्वनाथ, ख्वॉजाखॉ पठाण, अस्लम पटेल, साकीब शेख, नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते़.